चोरट्यानी घातला धुमाकूळ: काही तासाच्या अंतरात दोन ठिकाणी घरफोडी… 

  • गणेश मंदिरात रात्री दोन दानपेट्या फोडल्या, तर दुपारी घरफोडीमुळे नागरिकांमध्ये दहशत
  • दोन दिवसात चारठिकाणी चोरीच्या घटना

सातपूर (प्रतिनिधी): पाईपलाईनरोड रिलायन्स पेट्रोल पंपाजवळच असलेल्या महापालिकेच्या उद्यानातील गणेश मंदिरात मंगळवार (दि. २८) मध्यरात्री ते पहाटे दरम्यान तसेच बुधवारी (दि. २९) भर दुपारी चोरीच्या घटना घडल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. सातपूर परिसरात दोन दिवसात चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने नागरिक पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, अंबड आणि सातपूरमध्ये झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे एक लाख ३२ हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात भरदिवसा झालेल्या एका घरफोडीचा समावेश आहे.
सिडकोतील अधिक सदाशिव देशमुख (रा. हिरे शाळेजवळ, सावतानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देशमुख कुटुंबीय रविवारी (दि. २६) बाहेरगावी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली २५ हजारांची रोकड व सोन्याची पोत असा सुमारे ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार बनतोडे तपास करीत आहेत. दुसरी घरफोडी भरदिवसा झाली. सातपूर औद्योगिक वसाहतीतील अजिंक्य राजू सोनवणे (रा. गणेशनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे कुटुंबीय मंगळवारी (दि. २८) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली ५० हजारांची रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ७७ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार घारे तपास करीत आहेत.

मंगळवार (दि. २८)च्या मध्यरात्रीनंतर पावन गणेश मंदिरातील दोन दानपेट्या फोडत हजारो रुपयाची रक्कम लुटून नेली आहे. या घटनेचा तपास दुसऱ्या दिवशी बुधवार (दि. २९) सूरू असतानाच, दुपारी तीनच्या दरम्यान त्याच मंदिर परिसराजवळच राहणारे,अजिक्य सोनवणे याचे बंद घराचे कडी कोयंदा तोडत ३ वाजेच्या दरम्यान घरफोडी करत पाच तोळे सोने व ५० हजार रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. मंदिरात रात्री चोरी झाल्यानंतर काही तासातच बुधवारी दुपारी भर दिवसा भर वस्तीतील घर फोडून चोरी झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे. दोनच दिवसात चार ठिकाणी चोरीचे प्रकार घडल्याने पोलिसांनी रात्री बंदोबस वाढवावा अशी मागणी अॅड. महेंद्र शिंदे व नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!