नाशिक (प्रतिनिधी) : वडाळा-पाथर्डी मार्गावर भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यानी सुमारे साडे पाच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सव्वा लाखाच्या रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिन्याचा समावेश असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिनाथ बाबुराव शेवाळे (रा. लेन नं. ५, सराफनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेवाळे कुटुंबिय शुक्रवारी (दि. ७) सकाळी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचे गज तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली सव्वा लाखाची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ५ लाख ४० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
Related Posts
टोळक्याने केला तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला!
नाशिक (प्रतिनिधी): भावास मारहाण केल्याच्या कारणातून चारचाकीतून आलेल्या टोळक्याने परप्रांतीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना स्नेहनगर भागात घडली. या घटनेत…
अंबड येथील श्री कृष्ण नगर परिसरात सराफाच्या दुकानवर भर दिवसा दरोडो!
अंबड (प्रतिनिधी): अंबड परिसरातील कृष्णानगर येथील श्री ज्वेलर्स येथे दुपारी 2 वाजेच्या दरम्यान पिस्तूलचा धाक दाखवत तिन दरोडेखोरांनी दरोडा टाकला…
अखेर सणाच्या दिवशीच नायलाॅन मांज्यामुळे दुचाकीचालकावर ‘संक्रांत’
पाथर्डी फाटा ते वडनेर रस्त्यावर मांज्याने घेतला युवकाचा बळी नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या २२ वर्षीय…
