संकटमोचक महाजनांची घाई बागूल, राजवाडे यांना संकटात नेणारी ठरणार का?

नाशिक (प्रतिनिधी): पक्षातील निष्ठावंतांकडून प्रखरपणे विरोध होऊनही जलसंपदामंत्री तथा भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यामुळे सुधाकर बडगुजरांसह गणेश गितेंचाही प्रवेश सुकर झाला. मात्र, दुसरीकडे महाजन यांनी ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या भाजपा प्रवेशासाठी केलेली घाई या उभयतांना काहीशी संकटात नेणारी ठरली आहे किंवा यापुढे ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नाशकातील गजू घोडके यांना तीन-चार दिवसांपूर्वी मारहाण झाल्याप्रकरणी बागूल, राजवाडे यांच्यासह इतरांवर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता
असल्याने संबंधितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा
न्यायालयात धाव घेतली आहे. हा प्रकार ताजा
असतानाच दुसरीकडे बागूल आणि राजवाडे यांचा
भाजपा प्रवेशाचाही मुहूर्त ठरला. त्यांच्यासह गणेश
गिते व इतर माजी नगरसेवकांच्याही प्रवेशाची वाट
मोकळी करून देण्याच्या दृष्टीने गिरीश महाजन यांनी
सर्व तयारी केली. मात्र, नेमके या प्रवेशाच्या तयारीचा
सुगावा ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांना
लागला. त्यांनी बागूल आणि राजवाडे यांच्याविषयी :
ट्विट केले. ‘… फरार होणार भाजपात दाखल’
असे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
खा. राऊत यांनी अचूक टायमिंग साधत भाजपाला
खिंडीत अन् महाजनांना कोंडीत पकडले. त्यामुळे
बागूल व राजवाडे यांच्या प्रवेशाला ब्रेक लागला.
बागूल यांच्या प्रवेशासाठी भाजपाकडून अनेकदा
प्रयत्न करण्यात आले. मात्र, बुधवार (दि. ३) पर्यंत
ठाकरे गटाने भाजपाचे मनसुबे यशस्वी होऊ दिले
नव्हते. गुरुवारीही (दि. ३) बागूल यांचा भाजपा
प्रवेश टळला आहे. भाजपा प्रवेशाची कुणकुण लागताच ठाकरे गटाने बागूल आणि राजवाडे यांची हकालपट्टी करण्याची कारवाई
केली. तर दुसरीकडे भाजपाकडूनही दोघांचे प्रवेश
रोखण्यात आल्याने दोघेही कोंडीत सापडले आहेत.
यामुळे आता दोघांकडेही ‘वेट अॅण्ड वॉच ‘शिवाय पर्याय
उरलेला नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!