सिंहस्थ प्राधिकरणासाठी मिळणार ४ हजार ६९२ कोटी!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक व त्रंबकेश्वर येथे सन २०२७-२८ मध्ये होत असलेल्यासिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले आहे. या प्राधिकरणासाठी गुरुवारी (दि. ३) अधिवेशनात ४ हजार ६९२ कोटी इतक्या नियमित व ५८ कोटींच्या अनियमित खर्चासाठीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच, दैनंदिन कार्यालय चालविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी व तात्पुरत्या पदांची निर्मिती करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वरवर नाशिकमधील रामकुंड येथे ‘ध्वजारोहण’ सोहळ्याने होईल. तर २४ जुलै २०२८ रोजी ध्वज उतरवून या कुंभमेळ्याचा समारोप होईल.

कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मेळा प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत नाशिक-त्रंबकेश्वर सिंहस्थ प्राधिकरण स्थापन करण्याचे विधेयक मांडण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ४ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने प्राधिकरणासाठी अध्यादेश जारी केला होता. विधेयकानुसार, २२ सदस्यीय प्राधिकरणाचे नेतृत्व नाशिक विभागीय आयुक्त करतील आणि त्यात नाशिकचे जिल्हाधिकारी आणि नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक उपाध्यक्ष असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!