सकारात्मक विचारधारा धारण केल्यास यश निश्चित: डॉ संदीप भानोसे

नाशिक (प्रतिनिधी): स्वामी विवेकानंद व राजमाता जिजामाता आजही त्यांच्या विचारांनी व कृतीने सर्वांना प्रेरित करतात. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये चिकाटी, संयम, परिश्रम, सृजनशीलता व सकारात्मकता धारण केल्यास यश प्राप्ती निश्चित असे प्रतिपादन डॉ संदीप भानोसे यांनी केले.

नंदिनी ब्रिज जवळील शासकीय महिलांचे हॉस्टेलमध्ये डॉ भानोसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर होस्टेलच्या प्रमुख सुधाताई सावंत ,जागतिक विक्रमवीर प्राध्यापक अमोल अहिरे, राम अहिरे व संदीप भानोसे उपस्थित होते. सावंत ताईंनी भानोसे यांचा परिचय करून दिला.डॉ भानोसे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “स्वामी विवेकानंद व जिजामाता मध्ये सकारात्मकता, धाडस, कल्पकता, नाविन्याची कास धरणे, नियोजन क्षमता, निर्णय क्षमता, उत्तम संवाद कौशल्य, संघटन बांधणी व नेतृत्व गुण असे विशेष गुण धारण केले होते म्हणून आजही ते सर्वांना प्रेरित करतात”. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान यशस्वीरित्या राबविले. सुधाताई सावंत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!