जाकीरभाऊ शेख, विकास शेंडगे,
घाेटी (प्रतिनिधी): इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकांचे पडघम वाजताच आज अर्ज माघारी प्रक्रिया सुरू झाली. नगराध्यक्ष पदासाठी 6 अर्ज तर नगरसेवक पदासाठी तब्बल 83 अर्ज दाखल झाल्याने राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. गेल्या पाच पंचवार्षिकांपासून नगराध्यक्ष म्हणून काम पाहणारे संजयभाई इंदुलकर यांच्या नेतृत्वात इगतपुरी शहराने विकासाच्या वाटचालीत उल्लेखनीय पाऊले टाकली आहेत तर यापुढे ही भाजपच्या सतेच्या माध्यमातून विकासकामे करून आदर्श नगरपरिषद करण्यासाठी आता माननीय मुख्यमंत्री दे्वेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून निधी आणून
इगतपुरी शहाराचा कायापालट करू असे मत माजी नगरध्यक्ष संजय इंदुलकर व माजी उपनगरध्यक्ष नईमभाई खान यांनी व्यक्त केले आहे.
अलीकडेच भाजप मध्ये प्रवेश केलेले इगतपुरी शहराचे संजय भाई व नईमभाई यांच्या र्माफत इगतपुरी शहाराला विकासासाठी भरीव निधी मिळणार असल्याचे आश्वासन स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला असून, शहर पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने झेप घेणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेले इगतपुरी हे निसर्गाची खान आहे सर्वाधिक धरणे आणि पर्यटन यासाठी राज्यभर ओळखले जाते. मुंबई-नाशिक मार्गावरील प्रमुख विपश्याना केंद्र असल्याने येथे देशभरातून पर्यटक माेठ्या संख्येने येतात. त्यामुळे पर्यटकांना पायाभूत सुविधा, रस्ते, सुरक्षा व्यवस्थापन आणि स्वच्छता या महत्त्वाच्या बाबींसाठी माजी उपनगराध्यक्ष नईमभाई खान यांनी महत्त्वाच्या प्रस्तावांची मांडणी केली आहे.यावर प्रतिसाद देताना मंत्री महाजन यांनी, ङ्गइगतपुरीच्या पर्यटन आणि नागरी विकासासाठी शासन कटिबद्ध असून, आवश्यक निधी प्राधान्याने उपलब्ध करून देऊ,ङ्घ असे स्पष्ट आश्वासन दिले. स्थानिक नागरिकांमध्ये आशेचे वाटवरन झाले असून पुन्हा एकदा यावेळीही नगराध्यक्षपद भाजपाच्या ताब्यात जाणार असून, संजयभाई इंदुलकर आणि नईमभाई खान ही जाेडीच आगामी नगरसेवक आणि नेतृत्वाचा चेहरा असेल.
संजयभाई आणि नईमभाई यांनी जनतेला संदेश देताना सांगितले की, इगतपुरीने आता विकासाला संधी देऊन जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहाेत आणि पुन्हा जनतेचा काैल मिळेल, असा पूर्ण विश्वास आहे.
इगतपुरी नगरपरिषदेला भरीव विकासनिधी पालकमंत्री गिरीश महाजन
