सिंहस्थ २०२७ ची तयारी: नाशिक-त्र्यंबकेश्वर दरम्यान २० किमीचा विशेष ‘दिंडी मार्ग’ होणार

नाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सहापदरी रस्ता प्रकल्पाच्या आराखड्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुमारे २० किलोमीटर लांबीचा विशेष पादचारी मार्ग (दिंडी मार्ग) समाविष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक आणि वारकरी त्र्यंबकेश्वर येथील पवित्र स्नानासाठी आणि दर्शनासाठी पायी प्रवास करतात. हा नवीन दिंडी मार्ग कार्यान्वित झाल्यास भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर होणार आहे.
सहापदरी रस्त्यासोबतच हा दिंडी मार्ग विकसित केल्याने सिंहस्थ २०२७ साठीच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!