नाशिक (प्रतिनिधी): येत्या सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसराला अधिक सक्षम वाहतूक सुविधा देण्यासाठी प्रस्तावित 66.15 किलोमीटर रिंगरोड प्रकल्पाचा जमिनी अधिग्रहणाचा मार्ग शासनाने सुलभ केला आहे. या पैकी सुमारे 50 किमी भागात जमीन मालकांकडून थेट खरेदी पद्धतीने जमीन घेण्यात येणार असून, उर्वरित 16.15 किमीचा भाग विकास आराखड्यातील (डीपी रोड) असल्याने एमआरटीपी कायद्याच्या कलम 19 अंतर्गत संपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे.
