नवनिर्वाचित नगरसेवक शरदभाऊ फडोळ यांना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची सदिच्छा भेट

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक शरदभाऊ हरीभाऊ फडोळ यांना माजी आमदार डॉ. सुधीर भास्करराव तांबे यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत अभिनंदन केले. यावेळी डॉ. तांबे यांनी फेटा बांधून त्यांचा सन्मान केला आणि पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. तांबे म्हणाले की, “जनतेने दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण यांसारख्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करणे आवश्यक आहे.” शरदभाऊ फडोळ हे लोकाभिमुख नेतृत्व करत प्रभागाचा विकास साधतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच SMBT संस्थेच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना आरोग्यसेवेत आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. गरजू रुग्णांना सल्ला व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी संस्था तत्पर राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक शरदभाऊ फडोळ यांनी डॉ. तांबे यांचे आभार मानत, “जनतेच्या अपेक्षांनुसार पारदर्शक व विकासाभिमुख काम करण्याचा माझा प्रयत्न राहील,” अशी ग्वाही दिली. समवेत ज्ञानेश्वरभाऊ गायकवाड व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!