सलून व्यवसायिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला; गावात तणाव

नांदुर शिंगोटे (ता. 02 डिसेंबर 2025) गावातील सलून व्यवसायिक श्याम शंकर सोनवणे यांच्यावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री सुमारे 11.00 वाजता ते घरी जात असताना रस्त्यावरील लाईट बंद करून काही हल्लेखोरांनी लाकडी दांडके व लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळते. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात काही संशयितांचे नावे नमूद केली असून आरोपी MH14 HA 4263 या मोटारसायकलवरून पळून गेल्याचा दावा केला आहे.

हल्ल्यानंतरही WhatsApp द्वारे “जिवे मारू” अशा संदेशांद्वारे धमक्या मिळत असल्याचे त्यांनी पोलिसांना कळविले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित समाजबांधवांनी IPC 307 (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींची अटक करण्याची मागणी केली आहे.

समाजनेत्यांची तीव्र प्रतिक्रिया: समाजनेते वाल्मिक शिंदे म्हणाले,“हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर झालेला हल्ला आहे. आरोपींवर तात्काळ 307 अंतर्गत कठोर कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल.”

सामाजिक कार्यकर्ते संदीप व्यवहारे यांनीही निषेध नोंदवत सांगितले,
“सलून व्यवसायिकावर प्राणघातक हल्ला होतो आणि आरोपी अजूनही मोकाट फिरतात, हे अत्यंत गंभीर आहे. नाभिक समाज एकवटला असून आरोपींना तात्काळ अटक करणे गरजेचे आहे.”

गाव प्रशासनाची प्रतिक्रिया : सरपंच दिपक भाऊ बर्क यांनी सांगितले, “गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. WhatsApp वरून दिलेल्या धमक्या निंदनीय असून गावकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी त्वरेने कारवाई करावी.”

पिडीताच्या कुटुंबाचे निवेदन: श्याम सोनवणे यांच्या आई-वडिलांनी भावनिक प्रतिक्रिया देत सांगितले “मुलावर असा प्राणघातक हल्ला होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. अजूनही आरोपी पकडले गेले नाहीत, यामुळे भीती वाढली आहे. आमचा मुलगा मजुरी करून कुटुंब चालवत होता, त्याचा कोणाशी वादही नव्हता. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.”

मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित : घटनेच्या निषेधार्थ मंगेश शेळके, भारत दराडे, सुदाम आव्हाड, राजेंद्र दराडे, नागेश शेळके, योगेश शेळके, संजय सोनवणे, महेंद्र कानडी, दत्तात्रय पंडित, मनोज वैद्य, किरण दळवी, विकास सोनवणे, संकेत सोनवणे, प्रशांत शिंदे, राजू तुपे, किरण लोखंडे, सागर सोनवणे, गोरख आहेर, सोमनाथ वाघ, मच्छिंद्र सोनवणे, कानिफनाथ शिंदे, नारायण सोनवणे, योगेश सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, अविन बिडवे. तसेच गावातील ग्रामस्थ, माता-भगिनी व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!