नाशिक (प्रतिनिधी): देवदर्शनासाठी जाजपूर (ओडिशा) येथून आलेले महेश्वर राय (वय ७४) हे बेपत्ता झाले आहेत. नाशिक आणि शिर्डी येथे देवदर्शनासाठी ते कुटुंबीयांसोबत आले होते. २८ फेबु्रवारी रोजी ते शिर्डी येथे दाखल झाले. एका धर्मशाळेत मुक्काम केल्यानंतर दुसºया दिवशी १ मार्च रोजी ते दर्शनासाठी गेले असताना तेथून बेपत्ता झाले. शिर्डी येथून ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शिर्डीसह नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथेदेखील त्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शिर्डी येथील पोलिस ठाण्यात धाव घेत मिसिंग नोंदविली आहे. कोणाला हे वृद्ध आढळून आल्यास त्वरित पोलिसांत संपर्क करा.
Related Posts
अंतापुर येथील बँक मित्राच्या घरी लाखोंची रोकड लंपास करत चोरट्यांचा दरोडा!
तुषार रौंदळ, सटाणा (प्रतिनिधी) : बागलाण तालुक्यातील अंतापुर गावात घडलेल्या धाडसी घरफोडीने शांत वातावरण हादरून गेले. अनिल पुंडलिक जाधव यांच्या…
सलून व्यवसायिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला; गावात तणाव
नांदुर शिंगोटे (ता. 02 डिसेंबर 2025) गावातील सलून व्यवसायिक श्याम शंकर सोनवणे यांच्यावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना…
कामटवाडा येथे उभ्या दुचाकीवर कोयता मारत दहशत निर्माण करण्याचा पर्यंत्न: संशयितास पोलिसांचा चोप!
अंबड (प्रतिनिधी): कामटवाडा पश्चिम येथील इंद्रनगरी परिसरात भरदिवसा सकाळी 11:00वा. च्या सुमारास सुनिल इंगळे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीवर कोयता…
