नाशिक जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प आज होणार सादर

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मंगळवारी (दि. ४) दुपारी ४.३० वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक बोलाविण्यात आली आहे. दि. २८ फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार होता. मात्र, त्या दिवशी तो सादर न झाल्याने मंगळवारी तो सादर करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांत तयारी पूर्ण झाली आहे.
मागील वर्षी ४० कोटी ७६ लाखांचा अर्थसंकल्प वित्तीय वर्ष सन २०२४-२५ करिता उपलब्ध होणारी शिल्लक रक्कम १८ कोटी २० लाख असा एकूण ५८ कोटी ९६ लाखांच्या अर्थसंकल्पास जिल्हा परिषद बैठकीत सुधारणा करत मंजुरी देण्यात आली होती. यावर्षी या अर्थसंकल्पात किती वाढ होणार याकडे लक्ष लागले आहे. २०२५-२६ चा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेवर ठेवण्यासाठी वित्तीय नवीन आर्थिक वर्षाचे विषय समित्यांनी व त्या त्या विभाग प्रमुखांनी प्रस्तावित केलेल्या मागण्या या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण उत्पन्नाच्या बाबी विचारात घेऊन मागील वर्षाच्या केलेल्या तरतुदी, तसेच त्या अनुषंगाने झालेला खर्च याबाबतची आकडेवारी गृहीत धरून अर्थसंकल्प प्रस्तावित केला जाणार आहे. जिल्हा परिषदेने उत्पन्नाच्या एकूण बाबींच्या प्रमाणात कसा खर्च करावा याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खालीलप्रमाणे विभागणी करण्यात येणार आहे. यामध्ये कोणकोणत्या नावीन्यपूर्ण योजना असतील याकडेही लक्ष राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!