श्रमिक सेनेचा आजचा संप मागे: मागण्या मंजूर!

नाशिक (प्रतिनिधी): केंद्र शासनाने २१ मे २०२४ पासून रिक्षा टॅक्सी च्या योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरणसाठी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विलंबास दररोज ५० रुपये दंड आकारण्यात येत होता. त्यास विरोध करण्यासाठी अन्य मागण्यांसाठी श्रमिक सेनेच्या वतीने शुक्रवारी (दि. १२) महामोर्चाचे आयोजन केले होते. मात्र शासनाकडून या दंडास स्थगिती आदेश दिले असल्याने श्रमिक सेनेकडून पुकारण्यात आलेला शुक्रवारचा संप मागे घेण्यात आला असल्याचे श्रमिक सेनेचे महानगर प्रमुख मामा राजवाडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शासनाकडून श्रमिक सेनेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात आला असून, रिक्षा, टॅक्सी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करिता नाशिक आरटीओ कार्यालय कडून प्रतिदिन ५० रुपये दंड आकारण्यात येणाºया दंडास स्थगिती दिली आहे. यामुळे श्रमिक सेनेने रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, विद्यार्थी वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक करणाºया वाहनचालकांनी शुक्रवारी (दि. १२) सुरळीतपणे वाहतूक सुरू ठेवण्याचे आवाहन श्रमिक सेनेने केले आहे. पत्रकावर श्रमिक सेनेचे संस्थापक सुनील बागूल, कार्याध्यक्ष बाळासाहेब (भगवंत) पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामा राजवाडे, अशोक आडंगळे, कैलास बारावकर, गणेश रनमाळे, मनोज जाधव आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!