वणी (प्रतिनिधी): पिंपळगाव रस्त्यावर शुक्रवार, ता. ६ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास बोराळे फाट्याजवळ वणी बाजूकडून पिंपळगावकडे भरधाव वेगाने जाणारी तव्हेरा मोटरकार क्र. एम.एच. 19/ए.पी/9933 हिने मोटार सायकल क्र. एम. एच.15/बी.ए./2229 ला पाठीमाघून जोरदार धडक दिल्याने या धडकेत मोटरसायकलवरील गौरव तुकाराम पवार वय २०, मंगेश रमेश हीलीम, वय २३ व विजय रमेश हीलीम वय १६ रा. कारसुल, ता. निफाड हे गंभीर जखमी होवून त्यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यु झाला. याबाबत कारचालकावर शरद माधव पवार, रा. कारसुल यांच्या फिर्यादीवरुन अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात मृत्यु पावलेले मंगेश हिलीम व विजय हिलीम हे सख्खे भाऊ असून ते वणी येथील जमिर शेख यांच्या शेतात शेतमजुर म्हणून काम करीत होते. ते वणी येथे कारसूल येथे जात असतांना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
Related Posts
विज बंद शनिवारी: राणेनगर, इंदिरानगर परिसरात दिवसभर बत्ती गुल!
नविन नाशिक (प्रतिनिधी): अंबड उपकेंद्राच्या अंतर्गत विद्युत मंडळाचे दुरुस्ती काम केले जाणार असल्याने शनिवारी (दि.३) सकाळी ११ ते सायंकाळी ५…
जागा हो नाशिककर: गेल्या उन्हाळ्यात 35 डिग्री तर यावेळी 43 डिग्री तापमान होते पुढे काय? अनुभवले!
समाजाने पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज आहे: डॉ. संदीप भानोसे नाशिक (प्रतिनिधी): तीस-पस्तीस वर्षांपूर्वी नाशिकची ओळख थंड हवेचे ठिकाण म्हणून…
नाशिक जिल्ह्यातील ९६ तलाठी शासन सेवेत तर १५९ प्रतिक्षा यादितच!
जगदिश वाघ, नाशिक : दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तलाठी भरती प्रक्रियेतील नाशिक जिल्ह्यातील १७३ पैकी ९६ तलाठ्यांना गुरुवारी (दि. १)…
