देवळा (प्रतिनिधी): कर्जवसुली साठी राजकिय, प्रशासकीय दबावाला बळी न पडता देमको बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाने कर्ज वसुलीचे कामअतीशय तन्मयतेने केले असून,जुनी प्रकरणे निकाली काढत गेल्या दोन वर्षात ठेवींमध्ये तसेच कर्ज वाटपात देखील वाढ झाल्याने ही वार्षिक सर्वसाधारण सभा प्रगतीची असल्याची ग्वाही व्हा चेअरमन डॉ प्रशांत निकम यांनी दिली . यापुढेही कर्जवसुलीसाठी तसेच इतर धोरण निश्चित करताना कडक धोरण स्वीकारले जाईल असेही त्यांनी सांगितले. देमको बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी दि. ९ रोजी सकाळी ११ वाजता बँकेच्या स्वमालकीच्या मालेगाव रोडवरील जागेत चेअरमन कोमल कोठावदे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरण सम्पन्न झाली. अहवाल वर्षात दिवंगत थोर नेते, सभासद, ठेवीदार आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .तसेच इयत्ता१० वी ९० % व १२ वीत ८५% पेक्षा जास्त गुण मिळविण्याऱ्या सभासद पाल्यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले .
सभेत माजी चेअरमन डॉ विश्राम निकम,दिलीप मेतकर, नितीन शेवाळकर, के एस बच्छाव, सुनील आहेर ,पवन अहिरराव, सुधाकर मेतकर, धनंजय आहेर,विनोद शिंदे, एल एन शिरसाट, बाळासाहेब भांगडिया, शांताराम निकम यांनी चर्चेत भाग घेतला .अहवाल वाचन व्यवस्थापक नितीन बोरसे यांनी केले.
संचालक राजेंद्र सूर्यवंशी यांनी विस्तारित नाशिक शाखेबद्दल बोलताना सांगितले की, नव्याने स्थलांतरित झालेल्या सिडको शाखेत अवख्या वीस दिवसांत ३ कोटी ४० लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून,या शाखेने आतापर्यंत १० कोटी रुपयांच्या ठेवींचा पल्ला गाठला आहे . व कमी भाड्यात जागा उपलब्ध झाल्याने बँकेची बचत झाली आहे .सभासदांनी याकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी व्हा चेअरमन डॉ निकम यांनी देमको चॅरिटेबल ट्रस्टची स्थापन करण्यात यावी या माध्यमातून भविष्यात सभासदांसाठी विविध योजना राबविण्यात येतील याविषयाला सभेत सर्वानुमते मंजुरी मिळाली.
यावेळी सर्व संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.
