प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): मुकणे येथील महर्षी पुंजाबाबा गोवर्धने विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आयोजन करण्यात आले या स्पर्धांचे उद्घाटन वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राज पाटील, संस्थेचे सचिव बाळासाहेब ढोबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक राव, मुख्याध्यापक बाबासाहेब थोरात, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवान जाधव, लक्ष्मण गुळवे, घोटी बाजार समितीचे संचालक विष्णू पाटील राव, माजी सरपंच जगन पाटील राव व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्ताविक क्रीडा स्पर्धा प्रमुख विजय सोनवणे यांनी केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजीव पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, स्पर्धा या स्पर्धांप्रमाणेच खेळल्या जाव्यात मुलांबरोबरच मुलींनीही खेळांमध्ये यशस्वी होऊन आपल्या शाळेसह तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर उज्वल करावे तर संस्थेचे सचिव बाळासाहेब ढोबळे यांनी क्रीडा स्पर्धांसाठी सर्व विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करुन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक राव, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक बाबासाहेब थोरात आदींनी मनोगत व्यक्त करीत स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेतील विद्यार्थिनी वसुंधरा पिंटू मुकणे, चैताली खंडु वेल्हाळ या विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धेत विभाग स्तरावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तर यांना मार्गदर्शन करत त्यांचा सराव करून घेणारे मिनींनाथ गुळवे, समाधान बोराडे यांचाही शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रीडास्पर्धांच्या कार्यक्रमासाठी सोसायटी संचालक गजीराम राव, ग्रामपंचायत सदस्या अनुसयाताई वेल्हाळ, श्रीमती वरूनताई , खंडू वेल्हाळ, पिंटू मुकणे, सुनील चोरडिया, केवळ निकम , आहेर सर, रमेश उबाळे, तानाजी काजळे, पंडित सर, गुंजाळ सर, तानाजी काजळे, पंडित सर, भामरे सर, उशीर सर, धातडक सर, पवार सर, अनिल पाटील, श्रीमती पवार मॅडम हे क्रीडा शिक्षक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन खैरणार सर व उमेश महाजन सरांनी केले तसेच विद्यालयातील श्रीमती पाटील मॅडम श्रीमती निर्मल मॅडम श्रीमती चव्हाण मॅडम, देशमुख सर, गायकर सर, भोर सर, नेहरकर सर, खातळे सर तसेच अक्षय शिंपी, दिलीप पाटील अप्पा, रमेश गायकवाड व गौरव डावरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
