हिंदुस्थान फिड्सच्यावतीने मुकणे जि.प. शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!

प्रभाकर आवारी,

मुकणे (प्रतिनिधी): मुकणे जिल्हा परिषदशाळा येथे हिंदुस्थान फिड्स या दुग्ध कंपनीच्यावतीने इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यातआल्या.
बारामती येथील हिंदुस्थान कँटल फिड्स ही कंपनी सामाजिक बांधिलकी व शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तु वाटप करण्यात अग्रेसर असुन मुकणे येथेही शिक्षकांच्या मागणी वरुण सी.एस.आर. फ़ंडातून सदर कंपनीतर्फे इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

मुकणे : येथे शालय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करतांना हिरामण राव, विकास मुसळे, भास्करआवारी, गोकुळ राव, मुख्याध्यापिका वंदना पाटील, गिता गोसावी, प्रतिभा पाटील, प्रशांत चव्हाण आदींसह शिक्षक.

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या शिक्षकांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. यावेळी सरपंच हिरामण राव, दुग्धव्यवसायिक तथा कंपणीच्यावतीने विकास मुसळे, भास्कर आवारी, शालेय समितीचे गोकुळ राव, तुकाराम राव, तुळशीराम शिंदे, जयराम राव, गणेश बोराडे, नितीन आवारी, गणेश गुंजाळ, अनिल रायकर, शिवाजी राव, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील, सरला शेवाळे, गिता गोसावी, प्रमिला जगताप, प्रशांत चव्हाण, प्रतिभा पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!