- महामार्ग प्राधिकरणाच्या गोंदे येथील बैठकीत निर्णय
- खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर यांच्या मध्यस्थीने उपस्थितीत बैठक संपन्न
- उर्वरित ठिकाणच्या समस्यांची आज जागेवर जाऊन होणार पाहणी
प्रभाकर आवारी, (मुकणे : प्रतिनिधी): गोंदे दुमाला येथे होणाऱ्या अंडरपासला विरोध झाल्याने संबंधीत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी गोंदे येथे तक्रारदार गावकरी यांच्यासोबत बैठक घेतली या बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, मविप्र संचालक अँड.संदीप गुळवे, तहसीलदार अभिजित बारवकर, वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे दिलीप पाटील, ढगे आदी यावेळी बैठकीस उपस्थित होते.
गोंदे दुमाला येथे औद्योगिक वसाहत, वाहनांची व नागरिकांची वर्दळ याचा विचार करून
येथे होणाऱ्या अंडरपासला गोंदेकरांनी कडवा विरोध दर्शवला असता खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर व अँड.संदीप गुळवे, तहसीलदार अभिजित बारवकर, वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे
यांनी मध्यस्थी करीत गोंदे फाट्यावर २५ मिटर ऐवजी ६० मीटर रुंदी असलेला उड्डाणपूल मंजुर करण्याची मागणी केली असता अधिकाऱ्यांनी त्यास संमती दर्शवली मात्र प्रत्यक्षात सुरू असलेले काम हे तो पर्यंत बंदच ठेवायचे जो पर्यंत ६० मीटर रुंदीच्या कामाची सुरुवात होत नाही. यास तक्रारदार गावकरी व महामार्गाचे अधिकारी यांनी संमती दर्शवल्याने पुढील पाडळी फाटा येथे होणाऱ्या अंडरपासची उंची नेमकी किती.? हा प्रश्न पाडळी देशमुखकरांनी उपस्थित करून महामार्गाच्या दोनही बाजूने होणारे चेंबरचे काम निकृष्ट असुन हे काम टिकाऊ करण्याची मागणी केली यावेळी पाडळी फाटा येथे होणाऱ्या अंडरपासची उंची साडे पाच मिटर असुन पाडळी फाटा, मुंढेगाव तसेच पुढील कामांची पाहणी करून तक्रारदारांची समस्या जाणुन घेण्यासाठी आज गुरुवार दिनांक ३० रोजी सकाळी १० वाजता अधिकारी जागेवर येणार असुन संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी गोंदे दुमाला ग्रामपंचायतचे माजी सरपंच रमेश जाधव, शिवसेना नेते राजेंद्र नाठे, राजाराम धोंगडे, माजी सरपंच गणपत जाधव, पोलीस पाटील प्रकाश नाठे, कचरू धोंगडे, विजय नाठे, परशराम नाठे, तुकाराम वारघडे, विनोद नाठे, कारभारी नाठे, कमलाकर नाठे, मोहन जाधव, केशव नाठे, योगेश नाठे, देवा मोरे, खंडेराव धांडे, जयराम धांडे, विष्णु धोंगडे, विष्णु चव्हाण, विलास चाटे, बाळासाहेब आमले, संजय धोंगडे, पंडीत धांडे, जयराम धोंगडे, विष्णु चव्हाण, भोलानाथ चव्हाण, शाम चव्हाण, कार्तिक गतिर, राजु गतिर, गोरख गतिर, काळु गतिर, भगवान जाधव आदींसह गोंदे दुमाला, पाडळी देशमुख, मुंढेगाव, माणिकखांब आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
