नाशिक (प्रतिनिधी): खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांच्या दोन गटात शनिवारी (दि. ५) तुंबळ हाणामारी झाली. ही घटना वर्दळीच्या अशोक स्तंभ भागात घडली. अशोकस्तंभ परिसरात अनेक खासगी क्लासेस असून दिवसभर या भागात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. टिंगल टवाळीसह छेडखानीचे प्रकार सातत्याने घडत असताना शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक दोन गट एकमेकांमध्ये भिडले. भररस्त्यात दोन गटात सिनेस्टाइल हाणामारी झाली. दोन्ही गटातील तरुण एकमेकांना लाथाबुक्यांनी बेफामपणे मारत सुटल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. तर अनेकांनी आपले वाहने रस्त्यावरच थांबविल्याने वाहतूक कोंडी झाली होती. काही व्यावसायिकांनीही या घटनेचा धसका घेतला. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तत्पूर्वीच टोळक्यांनी पोबारा केला. दरम्यान, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. अशोकस्तंभ भागात खाद्यपदार्थ विक्रीची मोठ्या प्रमाणात दुकाने असून खासगी क्लासेसची संख्याही मोठी आहे. नजीकच महाविद्यालय असल्याने वर्दळ असते. त्यामुळे या भागातील गस्तीत वाढ करावी अशी मागणी होत आहे.
Related Posts
तडीपार केलेले असताना ही शहरात वावरत होता पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
नाशिक (प्रतिनिधी): हद्दपारीची कारवाई केलेली असताना शहरात वावरणा-या तडीपारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ही…
नाशकात अवैध धंदे चलवणा-यांकडून पत्रकारास मारहाण!
नाशिक (प्रतिनिधी): दत्त चौक सिडको येथे पत्रकारास मारहाण झाली अवैध धंदे सुरू असताना पत्रकाराने आवाज उठवला यावर पत्रकारांवर दहशत निर्माण…
सफाई कर्मचा-याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या!
नाशिक (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून वॉटर ग्रेस कंपनीच्या कर्मचा-याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना पंडित कॉलनीत मंगळवारी (दि. १)…
