घोटी (प्रतिनिधी): छगन भुजबळ यांच्यासारखे नेतृत्व आपल्या मागे आहे. आगामी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी उमेदवारी कुणाला पण दया मात्र राष्ट्रवादी काँग्रेचा आमदार झाला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा उभा राहिला पाहिजे व इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल आणि पक्ष बळकट करून अजित दादांच्या मागे राहून मुखमंत्री झाला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत महीसधुणे यांनी केले.
खंबाळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. आगामी काळात पक्ष संघटन वाढविण्यासाठी गावोगावी फिरून शासकीय योजनांची माहिती पोहचवून संघटन मजबूत करावे असे माजी आमदार शिवराम झोले यांनी व्यक्त केले. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. माजी आमदार शिवराम झोले, प्रदेशचिटणीस गोरख बोडके, तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, रतण जाधव, नामदेव वाघचौरे, अरुण पोरजे, माजी सरपंच पांडुरंग खातळे, नारायण वळकंदे, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, वसीम सय्यद, विष्णू चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी इगतपुरी तालुक्याच्या कार्यध्यक्ष पदी माजी सरपंच गोपाळ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष तथा माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केले तर यावेळी कार्यक्रमासाठी बाळासाहेब झोले, सरपंच गोपाळ पाटील, युवक अध्यक्ष राहुल सहाणे, गोटीराम शेलार, संजय कोकणे, गणपत जाधव, मदन कडू, निवृत्ती भगत, निवृती करवर, इमारण सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
