घरकुल योजनेत राज्यात नाशिकचा नंबर तिसरा!

नाशिक (प्रतिनिधी): पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्याला मिळालेल्या ४६ हजार ६७४ घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी १८ हजार ६७२ लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. दि. १७ सप्टेंबरपर्यंत देणार आलेल्या मुदतीत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट ग्रामीण विकास यंत्रणेने पूर्ण करण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, राज्यात एकूण २ लाख ५४ हजार ८३६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला असून यात नांदेड, यवतमाळनंतर नाशिक जिल्हा राज्यात तिसºया क्रमांकावर आहे.
राज्य शासनाने घरकुल योजना हाती घेतली आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्याला ४६ हजार ६७४ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. या घरकुलांचा पहिला हप्ता हा १७ सप्टेंबरपर्यंत वर्ग करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी यांनी तातडीने गटविकास अधिका-यांची बैठक घेतली. यात हे काम वेळेत व्हावे, यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेऊन काम करण्याचे फर्मान काढण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी व रविवारी शासकीय सुटीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवून लाभार्थी नोंदणीचे काम पूर्ण करण्यात आले. नोंदणीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण झाल्यावर, एकूण लाभार्थ्यांच्या ४० टक्के लाभार्थ्यांना १७ सप्टेंबरपर्यंत घरकुलाचा पहिला हप्ता वर्ग केला जाणार होता. त्यानुसार तालुका पातळीवर घरकुल नोंदणीचे तसेच आधारलिंक पडताळणीचे काम वेळेत पूर्ण झाले. नोंदणी पूर्ण झाल्यावर, शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ४० टक्के लाभार्थ्यांच्या खात्यात १७ सप्टेंबरला पहिला हप्त वर्ग केला आहे. एकूण १८ हजार ६७२ लाभार्थ्यांना घरकुल योजनेंतर्गत पहिला हप्ता प्राप्त झाला असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!