आजपासून नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका मातेचा यात्रोत्सव

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवास गुरुवार (दि. ३) पासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने ३.३० वाजता आरती, ५ वाजता विश्वस्तांच्या हस्ते कलश पूजन व ध्वजारोहण, तर ५.३० वाजता घटस्थापना होणार आहे. सकाळी ८ वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते महापूजा, ९ वाजता मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. सायंकाळी वाजता विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते महापूजा होईल, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिली.
यात्रोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात गुरुवारी सकाळी ८.३० वाजता सनई वादन आणि महिला भजनी मंडळाची सेवा, दुपारी १२ वाजता नैवेद्य, दुपारी २ ते ४ यावेळेत महिला मंडळाचे सप्तशती पाठ पठण, संध्याकाळी वाजता मंगल वाद्याचा गजर होईल. नऊ दिवसीय सोहळ्यात श्री कालिका देवी मंदिरात येणा-या भाविकांना दर्शन तत्काळ घेता यावे, यासाठी ट्रस्टकडून व्यवस्था करण्यात आली असल्याचे ट्रस्टचे सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया, सदस्य किशोर कोठावळे, आबासाहेब पवार, संतोष कोठावळे, विशाल पवार यांनी सांगितले.
जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815; 9822262885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!