नाशिक (प्रतिनिधी): शरद पौर्णिमा अर्थात अश्विन महिन्यातील कोजागरी पौर्णिमेचा मुहूर्तावर दूध आटवून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडल्यानंतर ते दूध प्राशन केले जाते, अशी परंपरा आहे. त्यामुळे कोजागरीला दुधाची मागणी दुप्पट होत असते. यंदा कोजागरीच्या पूर्वसंध्येलाच दूध दराने उसळी घेतली असून, दूधबाजारात दुधाचे दर १०० ते ११० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मागणी वाढल्याने सर्वसाधारणपणे दूध दरात १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. ऐनवेळी दुधासाठी धावाधाव होऊ नये म्हणून अनेकांनी दुधाचे आगाऊ बुकिंगही करून ठेवले आहे. दुधाचा रोजचा भाव ७० ते ८० रुपये लिटर आहे. मात्र, कोजागरी पौर्णिमेनिमित्त मंगळवारीच (दि. १५) मागणी वाढल्याने दुधाचे भाव ९० ते १०० रुपये प्रतिलिटरवर पोहोचले. तर बुधवारी दुधाचे दर १०० ते ११० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
Related Posts
दिवाळीनंतरच वाजणार नाशकात निवडणुकीचा बिगूल!
नाशिक (प्रतिनिधी): २०१७ च्या नाशिक महापालिका निवडणुकीत सरकारने चार सदस्यांचा प्रभाग तयार केला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारने २०१९…
भरदिवसा दोन घरफोड्या; चोरट्यांनी अडीच लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला!
नाशिक (प्रतिनिधी): आडगाव शिवारातील हनुमान आणि श्रीरामनगर भागात भरदिवसा दोन घरफोड्या झाल्या. या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांच्या ऐवजावर डल्ला…
बागलाणमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’ला उत्साहात सुरुवात
पहिल्या टप्प्यात ४८० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ; पुढील टप्पा १४ मार्चला विरगाव व डांगसौदाने येथे तुषार रौंदळ, सटाणा : बागलाण…
