२९ ऑक्टोंबर पर्यंत मुदत नाशिक जिल्ह्यात २० उमेदवारांचे अर्ज दाखल!

नाशिक (प्रतिनिधी): विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आ. नितीन पवार, आ. माणिकराव कोकाटे या विद्यमान आमदारांसह यांसह २० जणांनी गुरूपुष्यामृतच्या मुहुर्तावर गुरुवारी (दि. २४) उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण ४१८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले असून त्यापैकी २८ जणांनी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे अर्ज दाखल केले आहेत.

जिल्ह्यातील १५ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येते आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार (दि. २९) ऑक्टोंबर रोजी दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. मंगळवार (दि.२२) ऑक्टोंबरपासून नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) विक्री आणि स्वीकृतीला सुरूवात झाली असून गुरुवारी तिस-या दिवशी सर्वाधिक २० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापैकी सर्वाधिक पाच उमेदवारांनी दिंडोरीतून अर्ज दाखल केले. कळवण आणि मालेगाव बाह्य मतदारसंघातून प्रत्येकी तिघांनी तर सिन्नरमधून दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या २० जणांनी २९ तर आतापर्यंत २८ जणांनी ३७ अर्ज दाखल केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!