सटाणा (प्रतिनिधी): प्रगती शिक्षण संस्था संचलित प्रगती प्राथमिक विद्यामंदिर माध्यमिक विद्यामंदिर व डॉक्टर रूपाली कपूर बालविकास मंदिर या शाळेत संस्थेचे अध्यक्ष श्री रामकृष्ण वामन येवला यांच्या हस्ते व शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. कोठावदे व अमृतकर अतुल दिगंबर, एस .बी .देवरे यांच्या हस्ते सरस्वतीच पूजन व विद्यार्थ्यांचे औक्षन करून, पुष्पगुच्छ देऊन, मेहंदी काढून, सेल्फी काढून, स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक कोठावदे एस .बी.यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष दादा वाणी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मिळालेल्या पाठ्यपुस्तकांचे मुलांना वाटप करण्यात आले.तसेच मुलांना पंकज इनामदार यांच्यातर्फे बिस्कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षिका शेवाळे जे .बी .यांनी सूत्रसंचालन केले .तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भामरे व्ही पी, नेरकर आर.बी, अहिरे ए .आर., मोरे डी .ए ., गांगुर्डे एस .जे., डोईफोडे के.जी., रेखा देसले, रौंदळ एस.डी ., बेडसे सी.एम., सोनवणे एन. बी., पवार बी.ए ., शेवाळे आर .बी ., कदम मॅडम ., अहिरे मॅडम. , बागड यांनी परिश्रम घेतले.
Related Posts
मनपातील शंभरहून अधिक कर्मचारी होणार निवृत्त!
नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील स्थायी पदांवरील जवळपास ११० अधिकारी व कर्मचारी पुढील २०२५-२६ या वर्षात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे…
दिलासादायी: नाशिक जिल्ह्यातील धरणे भरली!
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील सर्व २४ धरणांतील जलसाठा ९८ टक्के झाला असून बहुतांश धरणांतून…
सटाणा महाविद्यालयात सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
सटाणा (प्रतिनिधी): कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात…
