नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून एका संशयिताने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहून तिने बाळाला जन्म दिल्याने हा प्रकर उघड झाला असून, याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल शांताराम लोंढे (वय २६, रा. माडसांगवी, ता. जि. नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडितेचे कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेले असता संशयिताने घरी एकट्या असलेल्या मुलीस गाठून हे कृत्य केले. त्याने अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, लग्नाचे आमिष दाखवून वेळवेळी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होता. यातून मुलगी गर्भवती राहिल्याने तिने एका मुलीस जन्म दिला आहे. यामुळे या घटनेचा उलगडा झाला असून, पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
