लाडक्या बहिणींनी वाढली धास्ती: पैसे नाकारले!

निकष पूर्ण न करणा-या लाभार्थ्यांवर होणार कारवाई?

नाशिक (प्रतिनिधी): मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जाची फेरतपासणी सुरू असून, निकष पूर्ण न करणाºया लाभार्थ्यांवर कारवाई होणार का, याबाबत अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे काही लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, काही महिलांनी स्वत:हून अर्ज करून मिळालेला लाभ नाकारत आहेत. जानेवारी २०२५ पर्यंत या योजनेच्या सात हप्त्यांचे प्रत्येकी दीड हजार रुपये याप्रमाणे १० हजार ५०० रुपये अनुदान नाशिक जिल्ह्यातील १५ लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र, पात्रतेची तपासणी सुरू असल्याने कारवाईच्या भीतीने जवळपास ३१ महिलांनी योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज केला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांपैकी लाखो अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात आले असून, राज्यभरातून अपात्र महिलांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येताच बहिणींमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणा-या महिलांची संख्या १५ लाख ७४ हजार ४०९ होती. यापैकी १४ लाख ९६ हजार महिला लाभार्थी पात्र ठरल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!