रिक्षा चालकाचा डोक्यात दगड घालून खून!

नाशिक (प्रतिनिधी): म्हसरूळ मध्ये रिक्षा चालकाचा डोक्यात दगड घालून खून प्रशांत अशोक तोडकर असे मयत चालकाचे नाव आहे.

प्रशांत अशोक तोडकर (वय २८) रा. आदर्शनगर, रामवाडी असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर युवक हा रिक्षाचालक चालक असून तो सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. सदर युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे बोलले जात असून शनिवारी दिवसभर हा युवक घरी होता. पंरतु, रात्री तो घराबाहेर पडला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज सकाळी आठ वाजता मयत युवकाच्या भावाला पोलिसांकडून त्याचा खून झाल्याची घटना समजली. सदर युवकाच्या पश्चात दोन भाऊ, एक बहिण आणि आई वडील असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!