नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाईन गेम च्या नावाखाली सर्रासपणे ऑनलाईन जुगारच सुरू असून यावर कुठेतरी अंकुश लादला गेला पाहिजेत, यामुळे अनेक लोकांसह लहान मुले देखील यावर पैसे लाऊन गेम नव्हेतर जुगारच खेळत आहे. अशाच एका ऑनलाईन गेममुळे अवघ्या सोळा वर्षाचा मुलगा बळी ठरला आहे. नाशिक येथील नाशिकरोड परिसरातील डायना नगर, जय भवानीरोड या भागातला सम्राट संदीप भालेराव (वय: 16 वर्ष) मुलगा ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरला. यातून आलेल्या नैराश्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. या घटनेने येथील परिसर हळहळला आहे. सम्राटच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. घरात एकमेव पुरुष असलेल्या सम्राटवर पुढे मोठी जबाबदारी होती, मात्र त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुख्य म्हणजे, या घटनेनंतर तरी प्रशासनाचे व पोलीस यंत्रणेचे डोळे उघडले अशा जुगार खेळवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का. हा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. आजून कितीतरी तरूण या ऑनलाईन जुगाराचे शिकार झाले असतील.
Related Posts
बिबट्याच्या तोंडातून आईने लेकीची केली सुटका!
नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्याने छोट्या बालिकेवर हल्ला केल्याचे लक्षात येताच तिच्या आईने हातातील विळ्याच्या मदतीने लेकीची बिबट्याच्या…
जागरुक नाशिककरांनो नायलॉन मांजा वापरणा-या विरुद्ध करा तक्रार: पो.आयुक्त संदीप कर्णिक
कुणीही नायलॉन मांजा पतंग उडवत असेल बिल्डिंग चे नाव, लोकेशन, परिसराचा पत्ता किंवा संबंधीत व्यक्तिचे फ़ोटो तात्काळ 9923323311 या नंबर…
महिला डॉक्टरसह, एका बड्या व्यावसायिकाला ७८ लाखांचा गंडा
धक्कादायक : ऑनलाईन शेअर्स खरेदीत मोठी फसवणूक नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाईन आयपीओ घेत त्या खात्यात विविध कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास सांगून…
