घाेटी (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकनाचा चांगलाच बिगुल वाजला असून सर्व राजकीय बैठकाना वेग आला आहे. दरम्यान तालुक्यातील सर्वाधिक महायुतीकडे उमेदवारांची इन्कमनींग सुरु असून तालुका पदाधिकाèयांनी फक्त स्थानिक उमेदवरांना संधी देण्यात यावी अशी मागणी जाेर धरू लागली आहे.
यामध्ये घाेटी शहर प्रमुख तानाजी रूमणे हे इगतपुरी तालुक्यातील व घाेटी गावातील स्थानिक उमेदवार असून ते शिवसेनेचे घाेटी शहर प्रमुख ही आहे. युवकांचा वाढता पाठींबा युवा नेतृत्व, कार्यकुशल, संघटन आदी बाबी त्यांच्याकडे असल्याने घाेटी गटातून शिवसेनेच्या वतीने त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी हाेत आहे.
दरम्यान घाेटी शहराच्या पाणीपुवराठा याेजनेसाठी तानाजी रूमणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत गेल्या दहा वर्षांपासून धुळखत असलेली याेजना सुरु करण्यासाठी तानाजी रूमणे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. तालुकाप्रमुख देवीदास जाधव, माजी सभापती संपत काळे, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ ताेकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी रूमणे हे काम करत आहे. वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली घाेटी गटात नक्कीच विकासगंगा वाहणार आहे यात मात्र दुमत नाही. जनतेची सेवा हेच उदिष्ट अन 20 टक्के राजकारण अन 80 टक्के समाजकारण अशी भूमिका असलेल्या तानाजी रूमणे कडे माेठ्या आशेने घाेटी गटातील नागरिक बघत आहे.
त्यामुळे उमेदवारी देताना फक्त स्थानिक तरूण नेतृत्व असलेल्या घाेटी शहर प्रमुखांनाच द्यावी असे मत आता घाेटी गटातून हाेत आहे. गेल्या महिन्याभरात पक्षात आलेले लाेक आता उमेदवारीसाठी सरसवाले असून इतके दिवस कुठे गेले हाेते असा प्रश्न आता नागरिकांकडून हाेत आहे.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी शिवसेनेच्या वतीने स्थानिकांना संधी देण्याची होतेय मागणी
