राज्यपाल आज नाशिक दौ-यावर!

नाशिक (प्रतिनिधी): राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि.२४) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठाचा ३० वा, तसेच महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचा २४ वा दीक्षान्त सोहळा आयोजित करण्यात आला. राज्यपालांच्या दौ-यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता मुक्त विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ पार पडणार आहे. विद्यापीठ परिसरात हा सोहळा होणार आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता आरोग्य विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा पार पडणार आहे. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. बी. एन. गंगाधर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
राज्यपाल यांच्या दौ-याच्या पाश्‍र्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी रविवारी (दि.२३) सकाळी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह महसूल, पोलिस व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्यपालांची सुरक्षा, मुक्तविद्यापीठ ते आरोग्य विद्यापीठ मार्गाची चाचपणी, तसेच अन्य बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!