नाशिक (प्रतिनिधी): वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी 1 एप्रिल रोजी प्रसिद्धी होत असल्याने तसेच महत्वाच्या सणामुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुद्रांक जिल्हाधिकारी व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च 2025 या शासकीय सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत, असे नाशिकचे सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणीचे काम करून घ्यावे, असे आवाहनही मुद्रांक जिल्हाधिकारी गायकवाड यांनी केले आहे.
Related Posts
वीज दरवाढीचा प्रस्ताव रद्द होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सातशे ग्राहकांनी केला विरोध!
१ ते १०० युनिट वीज वापरणा-या ग्राहकांना ‘टाइम आँफ डे’ योजनेचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट मीटर बसविणे अनिवार्य करू नये. शैक्षणिक…
नाशिक जिल्ह्यात थंडीसह पावसाचाही इशारा; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ!
थंडीचा परिणाम : लहान मुले, ज्येष्ठांना त्रास्त; सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ निफाड ८.० तर नाशिक १०.१ तसेच मालेगावचा पारा ११…
अनाथाश्रमातील मुलांची दिवाळी केली गोड!
वणी (प्रतिनिधी): वणी येथे बेस्ट अचिवर्स स्कुल मधील चिमुरड्यांनी अनाथाश्रमातील मुलांना फराळ, मिठाई व भेटवस्तु देत त्यांच्या सोबत दिवाळी साजरी…
