नाशिक (प्रतिनीधी) : नरेंद्र मोदी यांनी सलग तिस-यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये भाजप कार्यालय आणि विविध शाखांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी, डीजेच्या तालावर नाचत आणि लाडूंचे वाटप करत नाशिककर या ऐतिहासिकक्षणांचे नाशिककर साक्षीदार झाले. अशोक स्तंभ, सातपूर, पंचवटी, सिडको आदी परिसरातील भाजपच्या विविध शाखांनीही लाइव्ह प्रक्षेपण करीत नागरिकांना या सोहळ्याचा आनंद दिला. देशात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने बहुमत प्राप्त केल्यानंतर रविवारी (दि. ९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मंत्र्यांनी शपथ घेतली. यानिमित्ताने भाजपचे वसंत स्मृती कार्यालय येथेही फटाके फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याबरोबरच अशोक स्तंभ येथे स्क्रिनद्वारे शपथविधीचा सोहळा नाशिककरांनी पाहिला. यावेळी ब्रह्मवृंदाद्वारे शांतीपाठ करीत देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. प्रारंभी भारत माता की जय… असा जयघोष आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरणात चैतन्य पसरले होते. लाडू वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली
Related Posts
नाशिक येथे ४ महिन्यांत २० हजारांहून अधिक मतदारांची नावे वगळली!
चार महिन्यांत वगळली २० हजारांहून अधिक मतदारांची नावे नाशिक (प्रतिनीधी): जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरतपासणी करण्यात…
नाशकात वेगवेगळ्या भागात पकडलेले लाखो रूपये नक्की कोणाचे?
नाशिक (प्रतिनिधी): निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडले लाखो रुपये. नक्की हे पैसे आले कसे व कोणाचा हा प्रश्न तर…
समर्थकांची मते जाणून घेत पाटीलांनी मनसेकडून तिकिट घेत दंड थोपटले!
नाशिक पश्चिममध्ये तिरंगी लढत होणार चुरशीची! नाशिक (प्रतिनिधी): पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आ. सीमा हिरे, ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर, तर…
