नाशिक जिल्ह्यात सायंकाळपर्यंत ४६.७१ टक्के मतदान

नाशिक  (प्रतिनीधी): नगरपरिषद निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदवित सायंकाळपर्यंत सरासरी ४६.७१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदान प्रक्रिया सकाळपासूनच सुरळीतपणे सुरू झाली होती. पहिल्याच तासापासून काही केंद्रांवर रांगा दिसत होत्या. निवडणुकीत स्थानिक प्रश्न तसेच विकासाच्या आश्वासनांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. मतदान केंद्रांवर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयींचीही व्यवस्था करण्यात आली. मतदानाचा टक्का अजून वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!