रेशन कार्डधारकांना दिलासा: नाशिकरोड चे कार्यालय नविन नाशिकात!

नविन नाशिक, (प्रतिनिधी): नाशिकरोड येथील धान्य वितरण अधिकारी कार्यालय, नाशिक हे जिल्हा न्यायालय आवार येथे मा. जिल्हाधिकारी नाशिक यांचे आदेशान्वये दुरूस्तीचे कामकाज करणेकामी तात्पुरत्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालय आवार नाशिक येथील नविन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरीत करणेत आलेले आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणुन सद्यस्थितीत सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत नविन शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, विभक्त शिधापत्रिकेचे कामकाज हे ऑनलाइन पद्धतीने rcms.mahafood.gov.in या प्रणालीत public Login वरून करणेची सुविधा उपलब्ध करून देण्यांत आलेली आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीत नाव वाढविणे, नांव कमी करणे, नांवात बदल करणे, नांवात दुरूस्ती करणेचेही कामकाज ऑनर्लाइन पद्धतीने सुरू असल्याने नागरीकांना कार्यालयात येण्यांची अवशकता राहणार नाही. तसेच ऑफलाईन पद्धतीने नाव वाढविणे, नांव कमी करणे, नांवात बदल करणे, नांवात दुरूस्ती करणेचेही कामकाज हे धान्य वितरण अधिकारी कार्यालय नाशिक येथे नविन स्थलांतरीत करणेत आलेल्या कार्यालयात करणेत येईल.
तसेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक आवारातील सेतू कार्यालय येथे धान्य वितरण अधिकारी नाशिक यांचे कार्यालयाचे मदत कक्ष उभारण्यांत येणार आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणुन दक्षता घेण्यांत आलेली आहे. असे आवाहन गणेश जाधव, धान्य वितरण अधिकारी नाशिक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!